मार्शेटवार काका:


वाशिम म्हणजे जुने वत्सगुल्म वाकाटकांची राजधानी, आजच्या वाशिममध्ये हि तदकालीन अवशेष सापडतात, माहूर वेश, चंडिकावेश, काटी वेश, मंगळवारी वेश, जुन्या वैभवाची साक्ष सांगताना दिसतात. चंद्र् सरोवर, परशुराम तलाव, देव तलाव, पदम-तिर्थ, दारिद्र्य हरण तलाव, इटली तलाव हे जुन्या वैभावाचे वारसदार आहेत. गाव जून असल कि, घरे दाटून-दाटून असतात, रस्ते अरुंद असतात, कारण तेव्हाच्या गरजाच कमी होत्या. वाहने त्या आकाराची होती. लोकसंख्या कमी होती. वाशिम जुने शहर म्हणून अरुंद रस्ते, त्या अरुंद रस्तावरून जाताना आमची गाडी कासवगतीने चालत होती, रस्तावर जागोजागी दुचाकी लावलेल्या होत्या आणि रस्तावर लावलेल्या दुचाकी आवश्यक तेथे हटवत आमची गाडी कासव गतीने सरकू लागली आणि बरेच कसरतीने आम्ही गावामध्ये मार्शेटवर काकाच्या घरी पोहचलो.


काकाचे घर जुन्या बांधणीचे प्रशासत दुमजली घर समोरच्या हौलमध्ये बैठक व्यवस्था केलेली. घरामध्ये विविध पोस्टर लावलेले, प्रमुख्याने नेत्रदान, रक्तदान, लेक वाचवा अभियान, यावरील पोस्टारांचा भरणा, सोफ्यावर काकांच्या शेजारी वाजूला बसून आम्ही गप्पा भरू लागलो, आणि काका आम्हाला त्यांच्या जिवनातील आठवणी सांगू लागले. काका सागू लागले, माझा जन्म १९४२ चा माझे वडील सत्यशोधक समजाचे सदस्य होते. आणि ते भूमिगात स्वतंत्र सैनिक होते. वडिलांची व्यवसाय हा शिंपी कामाचा; त्यांचा शिवान कामाच्या जागी बाहेर भिंतीवर कोळश्याने एक औळ लिहिली होती, "येथे तिरंगा व खाकीचे कपडे मोफत शिवून मिळतील". ते लिहिलेले मी वाचायचो, वडील अशिकक्षित परंतु विचाराने परिपक्व होते. वडिलांकडे लोक यायचे देशभक्तीपर, राष्ट्रभक्तीपर चर्च्या होयायच्या, त्या मी एक-एक ऐकत होतो. परिस्थिती फार हालाकीची होती. सातवी ते नववी वर्गापर्यंत मी हॉटेलमध्ये हॉटेल बोय म्हणून काम केले. कपबश्या धुण्याचे व चहा वाटण्याचे काम केले. आई शेतात काम करायची व मीही तीच्या बरोबर शेतात जावू लागलो. शिक्षक चांगले मिळाले, त्यांचे संस्कार चांगले मिळाले. त्यांनी शिकण्याची प्रेरणा दिली आणि सोबतच रेनोल्ड मेमोरिअल होस्पिटल हे वाशिम शहरामध्ये एक ऐतिहासिक हॉस्पिटल. तेथे चांगले सेवाभावी लोक होते, त्यांच्याशी संपर्क आला. गाडगे बाबाची किर्तने एकली. तुकडोजी बाबाची राष्ट्रभक्ती भजने एकली आणि प्रेरणा मिळत गेली. रेनोल्ड मेमोरिअल होस्पिटलच्या 'डॉ. स्पकर' नावाच्या महिला डॉक्टर होत्या. त्याचा फोटो मी अजूनही जपून ठेवला आहे. त्यांच्याशी संपर्क आला, त्यांची ती निस्वार्थपणे काम करण्याची वृत्ती पाहत मग मी  गूग होत असे, त्यांचा आदर्श डोळ्यापुढे होता, मैट्रिक झालो आणि नंतर सहजच प्रायमरी शाळेमध्ये शिक्षक म्हणून नौकरी मिळाली. जीवनात काहीतरी स्थिरता मिळाली. गरिबीने थोडासा का होईना पिच्छा सोडला. नोकरी लागली तरी शिक्षण काही सुटले नाही. १९६२ साली बी.ए. झालो. आणि १९६२ साली भारत-चीन युद्ध पेटले. या युद्ध काळामध्ये यशवंतराव चव्हाणांनी आवाहान केले कि, आमचे सैनिकांना रक्ताविना  मरत आहेत. त्यांना रक्ताची गरज आहे. सर्वाना रक्तदान करा. आणि यशवंतरावांच्या आवाहना भारावून जाऊन मी १९६२ साली पहिल्यांदा रक्तदान केले. गावामध्ये हाफकिन इन्स्टिट्यूट गाडी आली होती, त्यागाडी मध्ये रक्तदान करण्याची सोय होती. रक्तदानाचे महत्व कळले. आणि देशभक्तीच्या भावनामधून १९६२ सालच्या युद्धाच्या वेळी अरुणाचल प्रदेशात जाऊन आलो. रेनोल्ड मेमोरिअल होस्पिटल 'डॉ. कार्क' यांच्या माझ्यावर लडा चळला ते माझ्याकडे येत, मी त्यांच्याकडे जात. शिक्षकी सुरूच होती. त्यांच्याकडून दवाखान्याच्या बऱ्याच गोष्टी कळाल्या. आपण काहीतरी चांगले केले पाहिजे, आशा विचार मनामध्ये आला. प्रचार-पसार काम करता येईल. रक्तदान आपल्याला करता येईल. यामाध्यमातून स्वतः रक्तदान केले आणि दुसर्यांकडून रक्तदान घडवून आणले. आणि डॉ. देशमुखाच्या हस्ते सत्काराचे भाग्य लाभले. काका असे आवेशात येवून आणि तलीनतेने त्याच्या गोष्टी सांगत होते आणि कांकाच्या व्यक्तीमत्वाचे एक-एक पाहेलू उघडत गेली.


काका सांगत होते कि, थोर-मोठ्यांचा संपर्क लाभला आणि त्यातूनच सामाजिककार्याची आवड निर्माण झाली. माग नोकरी पेशेमध्ये राहून काय समाजकार्य करू शकतो. सार्वजन समाजाकडून मला काय मिळते ह्याचा विचार करतात. "पण आपण काहीतरी वेगळे करायचे, मी समाजाला काय देवू शकतो". आणि मग असा विचार करता-करता. आपले जे उत्पन्न आहे, त्यातून जो आपण खर्च करतो, त्या खर्चामध्ये कपात करण्याची निश्चित अशाप्रमानात कपात करण्याची आणि काकाच्या मुलाने छिद्र असलेले मडके (गुप्त मडके/बचत बँक) आणून दाखवले. त्या मडक्यामध्ये आम्ही पैसे गोळा करतो, आणि जेव्हा केव्हा राष्टीय आपत्ती येते, तेव्हा संकल्प निधी म्हणून दान देतो. मागे सुनामी येवीन गेला, तेव्हा अशीच मदत काकांनी संकल्प निधी म्हणून पाठविला. लातूरला किल्लारीचा भूकंप झाला, तेव्हाही काका व काकाच्या कुटुबीयांनी व कांकाच्या मित्र मंडळाने अशी रक्कम पाठविली, असे त्यांनी सांगितले. काका पुढे सांगू लागले, वडील सत्यशोधक होते, त्यांचा कर्म-कांडला विरोध होता. वडिलांची ७५ वी झाली. तीही सामाजिक उपक्रमातून साजरी केली. रक्तदान करून साजरी केली आणि काही दिवसातच आई वारली, आईला मशानात जाळण्यासाठी नेले आणि काय ते मशानात दुर्गधी सर्व लोकांनी प्रातविधी उरकून घाण करून ठेवली होती. ती सरकवून क्रिया करू लागले. काही दिवसातच वडील गेले. तेव्हाही माशनात तीच स्थिती होती आणि बाहेर गावावरून आलेल्या नातेवैकाना उभे रहायला जागा नव्हती. गावकर्याची कुचुबना होत-होती. तसाच वडिलांचा अंत्यविधी आटोपला. पुढे डोक्यामध्ये विचाराचे स्पोट होत होता. आपल्या हातून या मशान भूमीचे काही उधार होणार नाही का? आणि हा विचार करत असतानाच निदान काही स्वच्छता करावी, काही झाडे लावावी. या भावनेतून तत्कालीन तहसीलदार "श्री कुबडे" यांच्या हस्ते मशानात २० झाडे लावाली. पाणी देण्याकरिता मुलागाही ठेवला, पण हा प्रयोग असस्वी ठरला. पुढील काका सेवानिवृत्त झाले आणि त्यांनी ठरविले कि, आता आपण आपले आयुष्य याच मशानात वाहून द्यायचे. लोक मेल्यावर मशानात जातात, आपण जीवतपणे मशानात जाऊया, आणि लोक मेल्यावर त्यांचा मशानात जाळतात आपण या मशानातील दुर्गध आणि कचार जाळून काढू. या गाडगे बाबाचा आदर्श पुढे होताच, मग गाडगे बाबांचा तो झाडू आठवला शेजारच्या शेतामध्ये तुराठ्याचा भरणा पडलेला होता, त्या शेतकर्याला उध्द्र्तेने तूरुराठया दिल्या आणि काकांनी त्यांच्या तुराठा (झाडू) बनविला. आणि सतत पुढचे दोन महिने पाला-पाचोळा, घाण जाळत राहिलो. आणि त्याच्या त्या स्वचेतेकडे लोकांचे लक्ष वेधल्या गेले. काल पर्यंत लोक याठिकाणी घाण करायला बसणारे लोक थोडे पुढे जावून बसू लागले. लोक प्रनिधीचे लक्ष त्याच्याकडे वळले आणि आमदार निधीतून मशानाला वाल-भिंत बाधण्यात आली. काकांची शताब्दी जवळ आली, तरी कुटुबीयांनी ५०,००० /- रुपयाचे काकांच्या शताब्दी निमित्त मशान भूमीला दान दिले आणि मशानभुमिचा कायापलट झाली. काका अगदी भावून होऊन सांगत होते हे माझे एकट्याचे नाही ह! माझ्या पत्नीची साथ नसती तर मला हे आधीच जमले नसते. माझी पत्नी हि चांगल्या घरातील सुक्षिकत  कुटूबातील. ती तत्कालीन मैट्रिक पास आहे. पण ती आमच्या प्रत्येक उपक्रमात साभागी होते, मला सहकार्य करते आणि प्रोत्साहनही देते.

काकू मात्र आतमधून स्तब्पणे हे ऐकत होत्या. काकुनी बनविलेला नास्ता तेव्हा मी खात होतो आणि खरोखरच त्या रुचकर नास्त्याची तारीफ केल्याशिवाय माझ्याने राहविले नाही. काकापुढे माशानाची गोष्ट सांगू लागले. मशाणाचा एक माणूस उध्दार करतो, त्यांची स्वच्छाता करतो, वृक्षारोपण करतो, ते लोकांनी पहिले आणि मग लोकांपुढील मदतदाते पुढे आले. "डॉ.हरिष बाहेती" हे त्या मधील पहिले. त्यांनी सहकार्य करण्याचे कबुल केले. त्यांनी काकांचे काम पहिले होते. मशानामध्ये लोक यायचे; पण त्यांना पिण्यासाठी सुध्दा त्या ठिकाणी पाणी नव्हते. अत्यांविधीसाठी पाणी घरून आणावे लागयचे आणि मग मशानामध्ये पाण्याची व्यवस्था करण्याचे ठरले. आणि श्री हरिष बाहेती यांनी आजूबाजूच्या स्मृतीप्रत्यार्थ मशानापर्यंत पाण्याची पाईप लाईन टाकून दिली. काही दुसर्या लोकांनी सुध्दा मदत केली. मशानात पाणी आणले. प्रेत्याची तर पाण्याची सोय लागली पण त्या बरोबर मयातीसोबत येणार्या लोकांची सुध्दा पाण्याची सोय लागली. खरी सोय लागली ती मशानातील झाडांची आता पर्यंत पाणी नसल्यामुळे न जगानारी झाडे जागू लागली.

मशानातील झोळी:

काका सांगू लागले. माझा मिस्टरशी संपर्क आला होता. मिस्टर इल्वर थोडे फिरू होते, मदत गोळा करत त्यातून आपला समाजकार्य चालवत. त्यातूनच काकांच्या मनात मशानात झोळी फिरविण्याची कल्पना आली. आणि पहिली झोळी फिरविली आणि खर पाहिलं तर झोळी फिरविणे म्हणजे साक्षात भिक मागणे. परंतु काकांनी त्यामध्ये कसलीही लाज वाटली नाही. आणि मदत गोळा झाली. ती मदत मशान भूमिच्या विकासाठी लावली. आणि मग काका मशानभूमीमध्ये ज्या कोणाच्या प्रेत जाळला आले असेल, त्यांच्या नातलगाला मशानात झोळी फिरवायला सांगू लागले. नातेवाईकाला मदत-मदत करा, असे सांगू लागले. तुमचा जो नातेवाईक मृत झाला आहे. त्याच्या स्मृर्तीप्रिथ मदत करा असे सांगू लागले. झोळीमध्ये मदत गोळा होऊ लागली, आणि लोकांनी झोळी फिरविणे, हि बाब मान्य केली आहे. मशानभूमी मधील झाडाला टांगलेली झोळी, आम्हाला दाखविली आणि ती झोळी फिरविण्याची प्रथा पडली आहे. प्रत्येक वेळी जेव्हा प्रेत जाळायला येते, तेव्हा संबधित प्रेताच्या नातेवाइकाकडून त्या ठिकाणी झोळी फिरविली जाते. आणि गोळा होणारा पैसा मशानभूमिच्या विकासकामासाठी दिला जातो. काकांनी या निधीचा विनियोग सुयोग्य व्हावा म्हणून ट्रस्ट स्थापित केली. ट्रस्टमध्ये प्रत्येक समाजातील लोक घेतले बँकेमध्ये खाते उघडले आणि आता मशानात झोळी फिरवून जमा होणारा निधी बँकेच्या खात्यामध्ये गोळा केला जातो, आणि त्यातून मशाणाचा विकास केला जातो. मग आता सुपीक, फुले, झाडणी बहारेल्या मशानभूमीकडे बोट दाखवून, काका सांगू लागले, यासाठी एकेकाळी मोठा-मोठे खेड्डे होते, ते मी स्वत: भरुन काढलेले आहे, त्यामुळे आज हे मशान फुले झाडांनी बहरलेल्या स्वरूपात दिसत आहे. कांकानी त्या मशान भूमीमध्ये केवळ झाडांची लागवड केली नाही, तर निवडून-निवडून झाडांची लागवड केलेली आहे. आंब्याची झाडे लावली परंतु एकाच जातीचे आंब्याची  झाडे लावली नाही, विविध जातीच्या आंब्याची झाडे लावली. देशाच्या कान-कोपार्यातून प्रजाती शोधून काढल्या आणि त्या ठिकाणी लावल्या. यामध्ये चिंच, कडूलिंब, पेरू, यांचे झाडे लावली. जमीन सुपिक नव्हती. त्याठिकाणी बाहेरून बैल-गाडीने, ट्रकटरच्या साह्याने काळी-कसदार माती आणून त्या जमिनी मध्ये टाकली आणि जमीन काही प्रमाणत सुपिक बनविली, आणि आता त्यामध्ये काही प्रमाणत पिके सुध्दा घेतली जातात. (हरबरा, तूर, मुंग, ई.) तर हे पिके कशासाठी, तर त्याठिकाणी जे माकडे आहेत, त्यांच्यासाठी. काका सांगतात, कि आम्ही त्याजमिनीतील पिक काढत नाही, तर ते माकडासाठी असते. आता त्याठिकाणच्या जमिनीतल आवळ्याच्या झाडाला आवळे सुध्दा आले आहेत.

कांकाच्या या उपक्रमाला मान्यवराचे योगदानही लाभले. कोणी सभामंडप बाधून दिला तर कोण बसण्याची व्यवस्था करून दिली तर कोणी पाण्याच्या पिण्याची सोय करून दिली. तर काका सांगतात तर त्याठिकाणी एका व्यक्तीने "शिवाजी महाराजांची" मूर्ती आणून त्याठिकाणी प्रतीस्थापना केली. आशाप्रकारे मशानाचा विकास होत गेला. त्या ठिकाणाहून एक नाला वाहत होता. तो वाकडा-तिकडा होता. पावसाळ्यामध्ये मशानात प्रेताना आणतानी त्यामुळे गैर-सोय होत होती तर काकांनी त्याला लोकसहभागातून दगडांनी व्यवस्थित बाधून काढले.

काकांनी त्याठिकाणी एक उपक्रम चालू केला आहे. काका पिप्यामध्ये चिंचेची, आंब्याची, पेरूची, फणसाची ई. झाडे लावतात आणि त्या झाडाला किमान तीन-चार वर्ष्याची होऊ देतात. आणि ज्या कोणाला ती झाडे लावायची आहेत, त्याना मोफत ती झाडे लावण्यासाठी देतात.

शाळातील विध्यार्थ्याची भेटी होऊ लागल्या, तर काकांनी त्याठिकाणी पर्यावरणाचे वर्ग चालू केले. त्या ठिकाणी मुलाना काका ३० - ४० मिनिटे मार्गदर्शन करतात. रक्तदान, नेत्रदान याविषयी काका लोकांना त्याठिकाणी मार्गदर्शन करतात.

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी व इतर सन काका मशानामधेच साजरे करतात. मला तर वाटते कि देशातील एकमेव मशान भूमी असेल कि, त्याठिकाणी झेंडा-वंदन केले जाते.


श्री राजेश खवले,  
निवाशी उप-जिल्हाधिकारी, वाशिम