बेडकाचा आदर्श...!

मराठी बोधकथा बेडकाचा आदर्श...!


       तळ्याच्या काठी बेडकांची वस्ती होती. काही अतंरावर एक मनोरा उभा होता. समस्त बेडूक जमात, त्या मनोर्‍याच्या उंचीकडे पाहून स्मितीत होत असे. या मनोर्‍यावर आपल्याला चढता येईल काय? असा विचार देखील काही तरुण बेडकांच्या मनात येत असे . पण वयाने मोठे झालेले बेडूक या तरुण बेडकांना समजावायचे, सागांयचे, बाबा! मनोर्‍यावर चढण्यासाठी अंगी खुप ताकत लागते, मनोर्‍यावर चढणे हे आपल्या बेडकांचे कार्य नव्हे! मनोर्‍यावर चढ्ण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे साक्षात मृत्यूला निमंत्रण! तरुण बेडूक निरुत्साहित व्हायचे.
      एकदा तरुण बेडकांचा वार्षीक उत्सव होता. सर्व तरुण बेडूक तळ्याच्या काठी जमले होते . अचानक कुणीतरी घोषणा फडकाविली की जो, मनोर्‍याच्या टोकापर्यंत चढून दाखवील त्याला विजयी विर म्हणुन घोषीत केले जाईल.

सर्व तरुण बेडकांनी मनोर्‍याकडे धाव घेतली. रस्त्यात म्हातारे बेडूक त्यांना धोके समजावून सांगत होते. ते ऐकून तरुण माघारी फिरत होते. सरते शेवटी फक्त तीन बेडुक मनोर्‍याच्या पायथ्याशी पोह्चले. तेथे जमलेल्या वृध्द बेडकाने मनोर्‍यावर चढण्यातील धोके मोठमोठ्याने समजावून सांगितले. दोन बेडूक माघारी फिरले पण उरलेला ऐक बेडूक मोठ्या जिद्दीचा होता. तो मनोर्‍यावर चढू लागला . जमलेले सर्व बेडूक पाहू लागले. परत फिरण्याची विनंती करु लागले. पण त्या बेडकाने कुणाचेही ऐकले नाही. तो चढतच गेला आणि शेवटी मनोर्‍याच्या टोकावर जावून पोहचला. सर्वांनी तोडांत बोटे घातली.
हा तरुण बेडुक जेव्हा खाली उतरला. तेव्हा सर्वांना त्याला उचलून घेतले. वाजत-गाजत त्याची मिरवणूक काढली. इतर बेडूक धोके समजावून सांगत असतांना तु कसा काय घाबरला नाही? असे त्याला विचारले पण तो स्तब्धच. शेवटी हा बेडूक बहिरा असल्याचे इतर बेड्कांच्या लक्षात आले.
      ज्यांना नविन वाटा चोखाळायचा आहेत, पण घरचे विरोध करताहेत, अशांसाठी हा बहिरा बेडूक आदर्श ठरावा!